दक्षिणकाशी कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव

0
107
दक्षिणकाशी कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव
दक्षिणकाशी कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव

दक्षिणकाशी कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव

कुणकेश्वर l प्रतिनिधी

देवगड तालुक्यातील दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजच्या पवित्र दिनानिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

यात्रोत्सवाचे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून नेटके नियोजन करण्यात आले आहे. एस.टी., महावितरण, पोलिस, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन तसेच दूरसंचार विभागांकडूनही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक, सुरक्षा व आरोग्य व्यवस्थेची योग्य खबरदारी घेतल्याने भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी विविध खेळण्यांचे स्टॉल उभारले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मिठाई, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने यामुळे यात्रा परिसर फुलून गेला आहे. पारंपरिक शेती अवजारे विक्रीस ठेवण्यात आली असून ग्रामीण महाशिवरात्रीनिमित्त कुंकश्वर येथे श्रद्धा, परंपरा आणि उत्सव यांचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here