मुंबईतील कोणत्याही शाळेचे खासगीकरण नाही!
मुंबई l प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण करण्यात आलेले नाही असं पालिकेने बजावून सांगितले आहे. तसेच मुंबईतील मराठी माध्यमांच्या शाळांच्या मुद्द्यांवर प्रशासन संवेदनशील आहे असंही पालिकेने म्हटले आहे.
गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मार्च 2025 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा 95 टक्के इतका निकाल लागला. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीत 97 टक्के इतके गुण पटकावले आहेत. यासोबतच गुणवत्ता वाढ, सराव परीक्षा असे उपक्रम राबविण्यात येतात. महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाचे फी घेतली जात नाही.


