Kokan: ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ अभियान अंतर्गत मठ नं.२ व बावडेकर विद्यालय शिरोडा प्रथम

0
76
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ अभियान अंतर्गत मठ नं.२ व बावडेकर विद्यालय शिरोडा प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी- ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ या अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या शासनाच्या उपक्रमामध्ये प्राथमिक शाळांमधून शाळा मठ नं.२ ने व माध्यमिक शाळांमधून गुरुवर्य अ.वि.बावडेकर विद्यालय शिरोडाने प्रथम क्रमांक मिळविला. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-जन्मऋणची-विलक्ष/

 ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ हे अभियान राज्यभर राबविण्यात आले. या निमित्ताने शाळा सुंदर बनाव्या, शाळेच्या भिंती बोलक्या व्हाव्यात, शाळेत अभिनव उपक्रम राबविले जावेत, मुलांना अभ्यास करताना आनंद मिळावा, शाळा सुंदर व्हाव्यात या उद्देशाने शासनाने हे अभियान राबविले. या उपक्रमांमध्ये वेंगुर्ला तालुक्यातील १३२ जि.प .प्राथमिक शाळांनी व २० माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. प्रथम केंद्रस्तरावर व नंतर तालुकास्तरावर मूल्यमापन करण्यात आले. यात प्राथमिक शाळांमध्ये तालुकास्तरावर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं.२ प्रथम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. वेतोरे नं. १ द्वितीय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मातोंड मिरिस्तेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. इतर व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये गुरुवर्य अ.वि.बावडेकर विद्यालय शिरोडा प्रथम, वेंगुर्ला हायस्कूल द्वितीय आणि अण्णासाहेब देसाई माध्यमिक विद्यालय परुळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाच्या शाळेला ३ लाख रुपये, द्वितीय क्रमांकला २ लाख रुपये व तृतीय क्रमांकाला १ लाख रुपये. तसेच माध्यमिक शाळांनाही अनुक्रमे ३ लाख, २ लाख, १ लाख रोख स्वरूपात बक्षिसे येऊन गौरविण्यात येणार आहे. या यशाबद्दल वेंगुर्ला पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

जि.प.पूर्ण पाथमिक शाळा मठ नं.२ तालुक्यात प्रथम येण्यात सर्व आजीमाजी विद्यार्थआजी माजी पालकग्रामस्थमुख्याध्यापिका सुनिता पाडगावकरसहकारी शिक्षिका ऋतिका राऊळसहकारी शिक्षक सिद्धेश्वर मुंडेविषयतज्ज्ञ शिवानी आळवेस्वयंसेविका सुमिदा परब आदींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here