एसी लोकलमध्ये तिकीट तपासणीत ३८ लाखांचा दंड वसूल

0
49
एसी लोकलमध्ये तिकीट तपासणीत ३८ लाखांचा दंड वसूल
एसी लोकलमध्ये तिकीट तपासणीत ३८ लाखांचा दंड वसूल

एसी लोकलमध्ये तिकीट तपासणीत ३८ लाखांचा दंड वसूल

मुंबई l प्रतिनिधी

मध्य रेल्वेने फेब्रुवारी २०२६ महिन्यात एसी लोकलमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान अनियमित तिकीट असलेल्या प्रवाशांवर कारवाई करत एकूण १२,२३५ प्रवाशांकडून ₹३८,५६,९९० इतका दंड वसूल करण्यात आला.

ही मोहीम प्रवाशांनी नियमांनुसार प्रवास करावा आणि रेल्वे महसूल वाढवण्यासाठी राबवण्यात आली होती. तपासणीदरम्यान तिकीट नसलेले किंवा चुकीच्या तिकिटावर प्रवास करणारे प्रवासी आढळून आले.

प्रवाशांनी कायदेशीर आणि त्रासमुक्त प्रवासासाठी योग्य तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे, मुंबई मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here