दादर-रत्नागिरी सेवा बंद; त्याच प्लॅटफॉर्मवरून दादर-गोरखपूर गाडी कायमस्वरूपी सुरू

0
111
मुंबई–सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी
मुंबई–सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी

दादर-रत्नागिरी सेवा बंद; त्याच प्लॅटफॉर्मवरून दादर-गोरखपूर गाडी कायमस्वरूपी सुरू

मुंबई : दादर-रत्नागिरी रेल्वे सेवेत महत्त्वाचा बदल करण्यात आला असून ही सेवा बंद करून त्याच प्लॅटफॉर्मवरून दादर-गोरखपूर गाडी कायमस्वरूपी सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून दादर-रत्नागिरी उपनगरीय गाड्यांच्या संचालनासंबंधी कारणे देत ही सेवा दिवा येथे स्थलांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता रत्नागिरीकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिवा स्थानकावरून प्रवास करावा लागणार आहे.

या बदलामुळे दादर स्थानकावरून थेट कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त होत असून, स्थानिकांकडून पुन्हा पूर्ववत सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here