बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्राताई पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी असलेल्या सुनेत्राताई पवार यांनी समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
या उमेदवारीमुळे बारामतीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता असून आगामी काळात ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.


