Job नोकरीची संधी! CRPF कॉन्स्टेबल भरती २०२६

0
56
Job नोकरीची संधी! CRPF कॉन्स्टेबल भरती २०२६
Job नोकरीची संधी! CRPF कॉन्स्टेबल भरती २०२६

Job नोकरीची संधी! CRPF कॉन्स्टेबल भरती २०२६

९,१९५ जागांसाठी अर्ज २० एप्रिलपासून

नवी दिल्ली (प्रतिनिधी): सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मार्फत कॉन्स्टेबल (टेक्निकल अँड ट्रेड्समन तसेच पायनियर) पदांसाठी २०२६ सालची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ९,१९५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यामध्ये ९,१७५ पदे कॉन्स्टेबल टेक्निकल अँड ट्रेड्समन (पुरुष/महिला) साठी तर २० पदे पायनियर विंगसाठी (फक्त पुरुष) राखीव आहेत. देशातील पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २० एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मे २०२६ आहे. उमेदवारांनी निर्धारित कालावधीत अर्ज आणि शुल्क भरून नोंदणी पूर्ण करावी.

भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि कौशल्य चाचणीचा समावेश असणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, शारीरिक निकष आणि इतर अटींची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेतून तपासावी.

देशसेवेची संधी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही भरती सुवर्णसंधी ठरत असून, पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here