सावंतवाडीत १ ते ३ मेदरम्यान जिल्हास्तरीय खुली एकेरी कॅरम स्पर्धा

0
49
सावंतवाडीत १ ते ३ मेदरम्यान जिल्हास्तरीय खुली एकेरी कॅरम स्पर्धा
सावंतवाडीत १ ते ३ मेदरम्यान जिल्हास्तरीय खुली एकेरी कॅरम स्पर्धा

सावंतवाडीत १ ते ३ मेदरम्यान जिल्हास्तरीय खुली एकेरी कॅरम स्पर्धा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुरस्कारा अंतर्गत तसेच सावंतवाडी नगरपरिषद पर्यटन व उद्यान सभापती सौ. मोहिनी सुरेंद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरीय खुल्या एकेरी कॅरम स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा १ ते ३ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.

शनिवार व रविवार दि. २ व ३ मे रोजी सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये सचिन घाडी मित्रमंडळाच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली असून जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या स्पर्धेत पहिल्या आठ क्रमांकांपर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार असून अव्वल तीन विजेत्यांना आकर्षक चषक प्रदान केले जाणार आहेत. तसेच व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱ्या खेळाडूंनाही विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना असोसिएशनतर्फे मोफत गणवेश देण्यात येणार असून जिल्ह्याचे नाव व लोगो असलेला पांढरा टी-शर्ट व फुल पॅन्ट घालणे अनिवार्य असेल. स्पर्धा एकाच खुल्या गटात खेळवली जाणार आहे.

स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क १०० रुपये व प्रवेश फी १५० रुपये असून नावनोंदणीची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२६ आहे. स्पर्धकांनी आपली नावे संबंधित तालुका प्रतिनिधीकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अवधूत भणगे तसेच नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी खेळाडूंना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here