डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि शिस्त आवश्यक – जिल्हाधिकारी किशन जावळे

0
32
डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि शिस्त आवश्यक – जिल्हाधिकारी किशन जावळे
डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि शिस्त आवश्यक – जिल्हाधिकारी किशन जावळे

डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि शिस्त आवश्यक – जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड : डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

Reserve Bank of India मुंबई आणि जिल्हा अग्रणी Bank of India यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित Training of Trainers (ToT) कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, आर्थिक शिस्त म्हणजे केवळ बचत नव्हे, तर उत्पन्नाचे योग्य नियोजन, खर्चावर नियंत्रण, सुजाण गुंतवणूक आणि कर्जाचे जबाबदारीने व्यवस्थापन होय. बदलत्या आर्थिक परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने आर्थिकदृष्ट्या सजग राहणे अत्यावश्यक आहे.

विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून आर्थिक साक्षरतेची जाणीव निर्माण करण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, बचतीचे महत्त्व, बँकिंग व्यवहार तसेच शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी Pradhan Mantri Jan Dhan Yojana, विविध विमा योजना, पेन्शन योजना आणि डिजिटल व्यवहारांचा प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ऑनलाइन व्यवहार करताना सायबर सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असा संदेशही देण्यात आला.

या प्रशिक्षणात बँकिंग व्यवहार, डिजिटल फसवणूक टाळण्याचे उपाय, Deposit Insurance and Credit Guarantee Corporation (DICGC) याबाबत माहिती आणि खऱ्या नोटा ओळखण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here