रत्नागिरीतर्फे राष्ट्रीय लोक न्यायालय शनिवारी ०९ मे, २०२६.

0
48
रत्नागिरीतर्फे राष्ट्रीय लोक न्यायालय शनिवारी ०९ मे, २०२६.
रत्नागिरीतर्फे राष्ट्रीय लोक न्यायालय शनिवारी ०९ मे, २०२६.

रत्नागिरीतर्फे राष्ट्रीय लोक न्यायालय शनिवारी ०९ मे, २०२६.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीतर्फे ९ मे, २०२६ रोजी जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी या लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा.

मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही वाय. जाधव यांनी केले आहे.

पक्षकारांनी त्यांची प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्याकरीता आपले वकील, संबंधीत न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले आहे.

लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रर्लवित तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक बाद, चेक बाउन्स, दिवाणी वाद, वाद दाखलपूर्व प्रकरणा अंतर्गत विद्युत कंपनी, बँका, पतसंस्था यांचे थकीत कर्जाबाबतची दाखल पूर्व प्रकरणे, तसेच नगरपरिषद, ग्रामपंचायत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची मामलेदार कोर्टात प्रलंबित वाद अशी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here