उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या
मुंबई : उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांनी काल ‘देवगिरी’ निवासस्थानी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची भेट घेत त्यांच्या विविध समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या.

यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांनी विविध प्रश्न समजून घेतले तसेच संबंधित मागण्यांवर सकारात्मक पद्धतीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान अनेक सामाजिक, स्थानिक आणि विकासकामांशी संबंधित विषयांवर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.


