वालावल-माऊली मंदिर उताराचा रस्ता धोकादायक
वाहनचालकांचा आंदोलनाचा इशारा
कुडाळ l मनोज देसाई :
वालावल ते चेंदवण या महत्त्वाच्या रस्त्याचे अलीकडेच डांबरीकरण करण्यात आले असले तरी वालावल ते माऊली मंदिर तिठ्ठा दरम्यानच्या अवघ्या १०० मीटर उताराच्या रस्त्याचे काम अपूर्ण ठेवण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सदर उताराचा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर आल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे अधिक कठीण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कुडाळ ते कवठी मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले असले तरी या उताराच्या भागाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप वाहन व रिक्षाचालकांकडून करण्यात येत आहे. या ठिकाणी वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
येत्या पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाने हा रस्ता तातडीने पक्का करून डांबरीकरण पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वाहनचालक आणि रिक्षाचालकांनी दिला


