५,४५९ पोलीस कर्मचाऱ्यांना घरबांधणीसाठी ₹१,७६८ कोटींची मंजुरी

0
21
५,४५९ पोलीस कर्मचाऱ्यांना घरबांधणीसाठी ₹१,७६८ कोटींची मंजुरी
५,४५९ पोलीस कर्मचाऱ्यांना घरबांधणीसाठी ₹१,७६८ कोटींची मंजुरी

५,४५९ पोलीस कर्मचाऱ्यांना घरबांधणीसाठी ₹१,७६८ कोटींची मंजुरी

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर केला असून, ५,४५९ पोलीस कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रीम स्वरूपात तब्बल ₹१,७६८.०८ कोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या पोलिसांना स्वतःचे घर मिळावे, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या प्रस्तावांना शासनाने मान्यता दिली असून, या निर्णयामुळे हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पोलिसांच्या सुरक्षित, स्थिर आणि सन्मानपूर्ण भविष्यासाठी शासन सातत्याने सकारात्मक पावले उचलत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here