पाट (कुडाळ) तलाव सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न
सिंधुदुर्ग : Nilesh Rane यांच्या हस्ते कुडाळ तालुक्यातील Pat गावातील तलाव सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील या महत्त्वपूर्ण विकासकामामुळे तलाव परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक होणार असून स्थानिक नागरिक तसेच भाविकांसाठी उत्तम व्यायाम व विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
तलाव हा गावाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू असल्याने या सुशोभीकरणामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळण्याबरोबरच पर्यटनवाढीलाही मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) हे कुडाळ तालुक्यात सातत्याने विविध विकासकामे राबवत असून, या प्रकल्पामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल ( Dada Sail), माजी अध्यक्ष संजय पडते (Sanjay Padte), काका कुडाळकर ( Kaka Kudalkar), पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक (Milind Naik), जि.प. सदस्य रुपेश कानडे (Rupesh Kanade), दीपक नारकर (Deepak Narkar), आरती पाटील (Aarti Patil), तालुका प्रमुख विनायक राणे (Vinayak Rane), उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर (Arvind Karalkar ), समाधान परब (Samadhan Parab) आणि यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी या विकासकामाचे स्वागत करत गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले.


