कणकवलीत दुर्मीळ रुद्राक्ष व महासिद्ध वनस्पतींचे दोन दिवसीय प्रदर्शन
कणकवलीत दुर्मीळ रुद्राक्ष व महासिद्ध वनस्पतींचे दोन दिवसीय प्रदर्शन
कणकवली:
कणकवली (Kankavli) येथील कॉलेज मार्गावरील लक्ष्मी-विष्णू हॉलमध्ये गुरुस्पर्श ज्योतिष विद्यालयाच्यावतीने नाथपंथीय महासिद्ध मोहिनी (वनस्पती) आणि रुद्राक्षांचे दुर्मीळ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सोमवार, १८ मे आणि मंगळवार, १९ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७.३० या वेळेत खुले राहणार आहे.
सात पिढ्यांच्या नाथपंथीय परंपरेशी संबंधित या प्रदर्शनात ऊर्जा संतुलन यंत्र, मस्म, सुगंधी द्रव्ये, खनिज, स्फटिक, वास्तू बांधणी, दिव्य महासिद्धी वनस्पती तसेच विविध प्रकारचे रुद्राक्ष पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनादरम्यान दिव्य ‘मोहिनी रसायन’ अनुभवासाठी भेट स्वरूपात देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना नाथपंथीय पद्धतीने गूढ आणि उर्जात्मक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. खरे रुद्राक्ष कसे ओळखावे, औषधी वनस्पतींचे गुणधर्म, दुर्मीळ वनस्पतींमधून मिळणारी ऊर्जा आणि त्यांचा उपयोग याबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच वास्तूदोष किंवा कौटुंबिक समस्यांवरही मार्गदर्शन केले जाणार आहे.
सिंधुदुर्गवासीयांनी या दुर्मीळ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गूढ विज्ञान संशोधक ज्योतिषी रुद्रांग बाळ गोसावी यांनी केले आहे.