रायगडातील बेरोजगार युवकांसाठी सुरक्षा रक्षक भरती मोहिमेला गती; कामगार मंत्र्यांचे निर्देश

0
32

रायगड :
आकाश फुंडकर यांनी रायगड जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षक पदावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी प्रक्रिया अधिक प्रभावी करून सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नरिमन भवन येथे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने नोंदणीकृत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणींबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीपासून ते विविध आस्थापनांच्या तपासणीपर्यंतची सर्व कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली. तसेच सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यावरही त्यांनी भर दिला.
या बैठकीला विक्रांत पाटील, कामगार विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मौड तसेच उपसचिव स्वप्नील कापडणीस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here