हार्बर लाईनच्या एसी लोकलला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद; १५ दिवसांत रेल्वेला १.९६ कोटींचे उत्पन्न

0
44
हार्बर लाईनच्या एसी लोकलला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद
हार्बर लाईनच्या एसी लोकलला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

हार्बर लाईनच्या एसी लोकलला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद; १५ दिवसांत रेल्वेला १.९६ कोटींचे उत्पन्न

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर लाईनवरील वातानुकूलित (एसी) लोकल सेवांना प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, १ ते १५ मे या कालावधीत या सेवांमधून रेल्वेला तब्बल १.९६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

रेल्वे प्रशासनाने १ मेपासून हार्बर लाईनवर अतिरिक्त १४ एसी लोकल फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता या मार्गावर दररोज एकूण २८ एसी लोकल फेऱ्या सुरू आहेत. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी प्रवासी एसी लोकलला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हार्बर लाईनवरील एसी लोकल सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद सातत्याने वाढत असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिक वर्गासाठी ही सेवा पसंतीचा पर्याय ठरत आहे. यामुळे रेल्वेच्या महसुलातही लक्षणीय वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
रेल्वे प्रशासनाकडून भविष्यातही प्रवाशांच्या मागणीनुसार एसी लोकल सेवांमध्ये वाढ करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here