NEET-UG पुनर्परीक्षेच्या तयारीचा उच्चस्तरीय आढावा; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची बैठक
NEET-UG पुनर्परीक्षेच्या तयारीचा उच्चस्तरीय आढावा; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची बैठक
नवी दिल्ली : आगामी NEET-UG पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.
शिक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन उपस्थित होते. राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) संदर्भातील शिफारशींच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणूनही डॉ. राधाकृष्णन काम पाहत आहेत.
बैठकीत NEET-UG पुनर्परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली.