मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सदिच्छा भेट

0
88
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सदिच्छा भेट
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सदिच्छा भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सदिच्छा भेट

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेत राज्यातील विविध विकास प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या विविध प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रगती तसेच आगामी नियोजनाबाबत पंतप्रधानांना माहिती दिली.
भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही नेहमीच प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते,” अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या समवेत ऊस आणि कांदा उत्पादकांच्या प्रश्नांबाबत, सिंचन प्रकल्प आणि जलजीवन मिशनच्या कामांबाबत महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here