पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज रद्द करा; आमदार जयंत पाटील यांची मागणी

0
94

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट तसेच सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात, असा दावा आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. इंधन दर कमी झाल्यास वाहनधारकांसह वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
सलग होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून कठीण आर्थिक परिस्थितीत शासनाने नागरिकांच्या हिताचा विचार करणे आवश्यक असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याच्या मागणीला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here