पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क; सिंधुदुर्गातील ५२ पेट्रोलपंप सुरळीत सुरू

0
112
वडाळ्यात इंधन चोरी रॅकेटचा पर्दाफाश; १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त
वडाळ्यात इंधन चोरी रॅकेटचा पर्दाफाश; १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क; सिंधुदुर्गातील ५२ पेट्रोलपंप सुरळीत सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ६० पेट्रोलपंपांपैकी ५२ पेट्रोलपंप नियमित सुरू असून केवळ ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित स्वरूपात इंधन उपलब्धतेच्या अडचणी निर्माण झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिली आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, ६ पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांचा तात्पुरता तुटवडा आहे. तर उर्वरित २ पेट्रोलपंपांपैकी एका ठिकाणी फक्त पेट्रोल उपलब्ध असून डिझेल उपलब्ध नाही, तर दुसऱ्या ठिकाणी डिझेल उपलब्ध असून पेट्रोल उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी आणि डेपो व्यवस्थापकांनी ड्राय झालेल्या पेट्रोलपंपांसाठी टँकर लोड करण्यात आल्याचे सांगितले असून उद्यापर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून इंधन साठा करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), इंडियन ऑईल (IOCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी प्रशासन सातत्याने संपर्कात आहे. कृत्रिम टंचाई, दरवाढ किंवा साठेबाजी रोखण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथके सक्रिय करण्यात आली असून पेट्रोलपंपांची तपासणी सुरू आहे. कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here