चोरीच्या कारचा ८ किमी सिनेस्टाईल पाठलाग; पोलीस कॉन्स्टेबल आश्रु हाके यांचा गौरव
चोरीच्या कारचा ८ किमी सिनेस्टाईल पाठलाग; पोलीस कॉन्स्टेबल आश्रु हाके यांचा गौरव
ठाणे, प्रतिनिधी : कर्नाटकातून चोरी करून आणलेल्या एका किया सेल्टोस कारचा तब्बल ७ ते ८ किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून धाडस, सतर्कता आणि कर्तव्यदक्षतेचे उत्कृष्ट उदाहरण सादर करणाऱ्या ठाणे वाहतूक शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल. आश्रु हाके (Ashru Hake ) यांचा गौरव करण्यात आला.
कर्तव्य बजावत असताना संशयास्पद वाहनाची माहिती मिळाल्यानंतर कॉन्स्टेबल हाके यांनी प्रसंगावधान राखत चोरीच्या किया सेल्टोस कारचा पाठलाग केला. जीवाची पर्वा न करता त्यांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे वाहनाचा माग काढण्यात आणि पुढील तपासाला महत्त्वाची मदत मिळाली.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे (Ashutosh Dumbre ) यांनी कॉन्स्टेबल आश्रु हाके यांचा प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सन्मान केला. पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
ठाणे पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने प्रभावी कारवाई करण्यात येत असून, अशा धाडसी अधिकाऱ्यांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.