रायगड शौचालय दुरावस्था : प्राधिकरण नव्हे, पुरातत्त्व विभाग जबाबदार – संभाजीराजे

0
77
रायगड शौचालय दुरावस्था : प्राधिकरण नव्हे, पुरातत्त्व विभाग जबाबदार – संभाजीराजे
रायगड शौचालय दुरावस्था : प्राधिकरण नव्हे, पुरातत्त्व विभाग जबाबदार – संभाजीराजे

रायगड शौचालय दुरावस्था : प्राधिकरण नव्हे, पुरातत्त्व विभाग जबाबदार – संभाजीराजे

रायगड, प्रतिनिधी : रायगड किल्ल्यावर असलेल्या शौचालयांच्या दुरावस्थेप्रकरणी रायगड विकास प्राधिकरणावर होत असलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करत अध्यक्ष युवराज संभाजी महाराज. (Yuvraj Sambhaji Maharaj ) यांनी प्राधिकरणाची भूमिका स्पष्ट केली आहे. रायगडावरील शौचालयांच्या देखभालीसाठी पुरातत्त्व विभाग आणि रायगड जिल्हा परिषद जबाबदार असून, विनाकारण रायगड विकास प्राधिकरणाला रोषास सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

युवराज संभाजीराजे यांनी सांगितले की, रायगड विकास प्राधिकरणाची कार्यकक्षा केवळ संवर्धन, विकासकामे आणि मूलभूत सुविधांची निर्मिती यापुरती मर्यादित आहे. प्राधिकरणाकडून उभारण्यात आलेल्या सुविधा संबंधित यंत्रणांकडे हस्तांतरित केल्यानंतर त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी त्या विभागांची असते.

त्यांच्या मते, रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून तिकीट आकारणी करणारा पुरातत्व विभाग (Archaeological Survey of India ) आणि व रायगड जिल्हा परिषद (स्थानिक ) प्रशासनाने सुविधांच्या देखभालीबाबत अधिक जबाबदारीने काम करणे अपेक्षित आहे. मात्र, या यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे सुविधा खराब होत असून त्याचा दोष रायगड विकास प्राधिकरणावर टाकला जात आहे.
प्राधिकरणाला उपलब्ध निधी केवळ विकासकामे आणि सुविधा उभारण्यासाठी वापरता येतो. उभारलेल्या सुविधांची नियमित देखभाल करण्यासाठी त्या निधीचा वापर करण्याची तरतूद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगडसारख्या ऐतिहासिक आणि प्रेरणास्थान असलेल्या दुर्गावर येणाऱ्या लाखो पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here