पेण नगरपरिषदेचा निर्णय : घंटागाडीवरून आता मराठीतूनच स्वच्छतेचे संदेश

0
17
पेण नगरपरिषदेचा निर्णय : घंटागाडीवरून आता मराठीतूनच स्वच्छतेचे संदेश
पेण नगरपरिषदेचा निर्णय : घंटागाडीवरून आता मराठीतूनच स्वच्छतेचे संदेश

पेण नगरपरिषदेचा निर्णय : घंटागाडीवरून आता मराठीतूनच स्वच्छतेचे संदेश


सामाजिक कार्यकर्ते जीवन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; स्थानिक भाषेला मिळाला सन्मान
पेण : पेण नगरपरिषदेच्या स्वच्छता जनजागृतीसाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडीवरील संदेश आता हिंदीऐवजी स्थानिक मायबोली मराठीतून प्रसारित केले जाणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते तथा माजी बीएमसी अभियंता इंजि. जीवन शंकर पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
२७ मे २०२६ रोजी जीवन पाटील यांनी पेण नगरपरिषदेला लेखी निवेदन सादर करून स्वच्छता मोहिमेतील संदेश मराठी भाषेतून देण्याची मागणी केली होती. महाराष्ट्राच्या राजभाषेला दुय्यम स्थान मिळत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करत स्थानिक नागरिकांशी संवाद त्यांच्या मातृभाषेतच व्हावा, अशी भूमिका मांडली होती.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने घंटागाडीवरील संदेश मराठीतून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पेण शहरातील नागरिकांना स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबतचे संदेश मराठी भाषेतून ऐकायला मिळणार आहेत.
याबाबत बोलताना जीवन पाटील म्हणाले, “मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान आहे. स्थानिक नागरिकांशी संवाद त्यांच्या भाषेत झाला तर जनजागृती अधिक प्रभावी ठरते.”
या निर्णयाचे शहरातील मराठीभाषी नागरिकांनी स्वागत केले असून स्थानिक सांस्कृतिक अस्मिता जपण्याच्या दिशेने हे सकारात्मक पाऊल असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसेच मराठीतील संदेशांमुळे स्वच्छतेबाबतची जनजागृती अधिक व्यापक आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here