ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनेलची पत्रकार परिषद संपन्न
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनेलची पत्रकार परिषद संपन्न
ठाणे –
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनेलची पत्रकार परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना, बँकेची पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यपद्धती तसेच सभासद, शेतकरी आणि सर्वसामान्य हितधारकांच्या हितसंरक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सहकार चळवळीची गौरवशाली परंपरा अधिक मजबूत करण्याचा आणि सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकार क्षेत्राला अधिक सक्षम बनविण्यासाठी विश्वास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकास या तत्त्वांवर भर देण्यात आला.
पत्रकार परिषदेत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अधिक सशक्त, गतिमान आणि लोकाभिमुख बनविण्याचा संकल्प मांडण्यात आला. शेतकरी, सभासद आणि ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करत सहकार क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करण्यासाठी सहकार पॅनेल कटिबद्ध असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला बाळ्या मामा म्हात्रे, नरेश मस्के, प्रताप सरनाईक यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नेते, सहकार क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते तसेच पत्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.