लखनऊतील कोचिंग सेंटरला भीषण आग; १५ जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या

0
47

लखनऊ, दि. २२ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अलीगंज परिसरात सोमवारी दुपारी एका कोचिंग सेंटर असलेल्या व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागून किमान १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अलीगंजमधील उषा मेहता मार्गावरील तीन मजली इमारतीत ही आग लागली. संबंधित इमारतीत कोचिंग सेंटर, गेमिंग झोन तसेच इतर व्यावसायिक आस्थापने कार्यरत होती. आग वेगाने पसरल्याने अनेक विद्यार्थी आणि नागरिक इमारतीत अडकले. धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या ज्वाळांमुळे जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या, पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्यासाठी विशेष यंत्रणा तैनात करण्यात आली असून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाठविले असून बचाव आणि मदतकार्य वेगाने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेचीही तपासणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here