राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण

0
18
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्रातील सात मान्यवरांचा गौरव

नवी दिल्ली :
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील ‘गणतंत्र मंडप’ येथे आयोजित विशेष समारंभात करण्यात आले. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्रातील सात मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

या समारंभास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.,

कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा  (Rohit Sharma) यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. आर्मिडा फर्नांडिस (Dr.Armida Fernandis) यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला.
वारली आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे जतन करणारे ८९ वर्षीय तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभिनेते, पटकथालेखक, निर्माते आणि दिग्दर्शक आर. माधवन (R. Madhavan) यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या वतीने हा सन्मान त्यांचे बंधू अरविंद मामनिया यांनी स्वीकारला.
उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे (Ashok Khade)यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
देशाच्या प्रगतीत विविध क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या सन्मानांमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here