तुमच्या गावात पावसाळ्यात कोणत्या रानभाज्या मिळतात? आम्हाला नक्की सांगा!
तुमच्या गावात पावसाळ्यात कोणत्या रानभाज्या मिळतात? आम्हाला नक्की सांगा!
सिंधुदुर्ग समाचार | विशेष उपक्रम
पावसाळा सुरू झाला की निसर्गाची हिरवीगार उधळण सुरू होते. शेतांच्या बांधावर, डोंगर-दऱ्यांमध्ये आणि जंगल परिसरात अनेक पौष्टिक रानभाज्या उगवतात. पूर्वीच्या पिढ्यांच्या आहाराचा अविभाज्य भाग असलेल्या या रानभाज्या आजही ग्रामीण भागात मोठ्या आवडीने खाल्ल्या जातात.
तेरडा, कुरडू, टाकळा, भारंगी, फोडशी, शेवळा, रानअळू, रानचाकवत, रानमाठ अशा अनेक रानभाज्या केवळ चविष्टच नाहीत, तर पोषणमूल्यांनीही समृद्ध आहेत. लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटकांनी भरपूर असलेल्या या भाज्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानल्या जातात.
आता तुमच्यासाठी एक खास प्रश्न…
📢 तुमच्या गावात पावसाळ्यात कोणत्या रानभाज्या मिळतात?
त्यांची स्थानिक नावे, त्या कशा बनवतात, त्यांचे औषधी किंवा पारंपरिक महत्त्व काय आहे, हे आम्हाला जरूर सांगा. [email protected]
तुमच्या माहितीमुळे महाराष्ट्रातील पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि रानभाज्यांचा अमूल्य वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.