पेण तालुक्यातील ईव्हीएम सुरक्षा गोदामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून त्रैमासिक तपासणी
रायगड, दि. १ : पेण तालुक्यातील शितोळे येथील ईव्हीएम (EVM) सुरक्षा गोदामाची जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्रैमासिक अंतर्गत तपासणी केली.
पेण तालुक्यातील ईव्हीएम सुरक्षा गोदामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून त्रैमासिक तपासणी
यावेळी त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची सविस्तर पाहणी करून आवश्यक बाबींचा आढावा घेतला. ईव्हीएम सुरक्षा गोदामातील सुरक्षा यंत्रणा आणि अन्य आवश्यक व्यवस्थांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.