जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
मुंबई, दि. ३ : थोर स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार, लोकमत समूहाचे संस्थापक संपादक तथा माजी मंत्री स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज परिसरात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी स्व. जवाहरलालजी दर्डा यांनी स्वातंत्र्य चळवळ, पत्रकारिता, समाजकारण आणि लोकसेवा या क्षेत्रांत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यातून समाजजीवनात लोकाभिमुख विचारांना बळ मिळाले असून, त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक राहील, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच लोकमत समूहाशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.