उरणमध्ये मन्यार साप चावल्याने महिलेचा मृत्यू; उरण सर्पमित्र संपर्क यादी

0
15
उरण सर्पमित्र संपर्क यादी
उरण सर्पमित्र संपर्क यादी

उरणमध्ये मन्यार साप चावल्याने महिलेचा मृत्यू ; उरण सर्पमित्र संपर्क यादी

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन ; साप दिसल्यास धोका न पत्करता तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधा

उरण | प्रतिनिधी
उरण तालुक्यातील डोंगरी गावात तीन दिवसांपूर्वी एका महिलेचा अतिविषारी मन्यार (Common Krait) साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उरण सर्पमित्र संपर्क यादी
उरण सर्पमित्र संपर्क यादी
पावसाळ्यात सापांचा वावर वाढत असल्याने साप घरात किंवा परिसरात आढळल्यास स्वतः पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये. अनेकांना विषारी आणि बिनविषारी सापांची अचूक ओळख नसल्याने अशा वेळी कोणताही धोका न पत्करता जवळच्या सर्पमित्राशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी उरण तालुक्यात कार्यरत असलेल्या सर्पमित्रांची संपर्क यादी नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. साप चावल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता रुग्णाला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेऊन उपचार सुरू करणे, हेच जीव वाचविण्याचे सर्वात प्रभावी पाऊल असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here