अतिमुसळधार पावसाचा इशारा; रायगड जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी

0
20
अतिमुसळधार पावसाचा इशारा; रायगड जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी
अतिमुसळधार पावसाचा इशारा; रायगड जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी
अतिमुसळधार पावसाचा इशारा; रायगड जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; अंगणवाड्यांपासून उच्च माध्यमिक शाळांपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद

अलिबाग | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात सोमवार, ६ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात आदेश जारी केला असून, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा सोमवारी बंद राहणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून, पालकांनीही हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here