रेल्वेमार्ग वाहून गेल्याने एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस रद्द – पश्चिम रेल्वेची घोषणा

0
15
रेल्वेमार्ग वाहून गेल्याने एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस रद्द - पश्चिम रेल्वेची घोषणा
रेल्वेमार्ग वाहून गेल्याने एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस रद्द - पश्चिम रेल्वेची घोषणा

रेल्वेमार्ग वाहून गेल्याने एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस रद्द – पश्चिम रेल्वेची घोषणा

मुंबई :
गुजरातमधील अमळसादजवळ किमी २२०/२२८ येथे मुसळधार पावसामुळे रेल्वेमार्ग वाहून गेल्याने बिलिमोरा विभागातील सर्व मार्गांवरील रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने ट्रेन क्रमांक २२६५५ एर्नाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी एर्नाकुलम जंक्शन येथून सुटणारा ट्रेन क्रमांक २२६५५ एर्नाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसचा संपूर्ण प्रवास रद्द करण्यात आला आहे.
रेल्वेमार्गावरील नुकसान दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरच रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासावी, तसेच रेल्वे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here