परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी माजी सैनिकाच्या पाल्यास १ लाखांची आर्थिक मदत; सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत धनादेश प्रदान

0
18

कुडाळ  :
सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कल्याणकारी निधी योजनेअंतर्गत माजी सैनिकाच्या पाल्यास परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
कुडाळ तालुक्यातील गावराई येथील माजी सैनिक विठ्ठल जनार्दन काळे यांचे सुपुत्र गणेश विठ्ठल काळे हे सध्या किर्गिझस्तान येथे एमबीबीएस प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी सैनिक कल्याण विभागाच्या कल्याणकारी निधीतून १ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
या धनादेशाचे वितरण निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छींद्र सुकटे यांच्या हस्ते २४ जुलै २०२६ रोजी करण्यात आले. यावेळी वरिष्ठ लिपिक लक्ष्मण कोळी, कल्याण संघटक आण्णासाहेब माने तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मच्छींद्र सुकटे यांनी जिल्ह्यातील शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक तसेच त्यांची अनाथ पाल्ये आणि अवलंबितांनी सैनिक कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, स्वयंरोजगार, पुनर्वसन आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
तसेच योजनांबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अथवा दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८२० वर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here