अलिबागमधील महिला बचतगटांच्या उद्योगांची सीईओ नेहा भोसले यांच्याकडून पाहणी; महिलांच्या उद्यमशीलतेचे कौतुक

0
9
अलिबागमधील महिला बचतगटांच्या उद्योगांची सीईओ नेहा भोसले यांच्याकडून पाहणी
अलिबागमधील महिला बचतगटांच्या उद्योगांची सीईओ नेहा भोसले यांच्याकडून पाहणी

अलिबागमधील महिला बचतगटांच्या उद्योगांची सीईओ नेहा भोसले यांच्याकडून पाहणी; महिलांच्या उद्यमशीलतेचे कौतुक

अलिबाग | प्रतिनिधी
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील महिला बचतगट विविध उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन आणि स्थैर्य प्राप्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आपल्या टीमसह अलिबाग तालुक्यातील विविध महिला बचतगटांच्या उद्योगांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाची पाहणी केली.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रियदर्शिनी मोरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी कामार्ले ग्रामपंचायत येथील वैभवलक्ष्मी बचतगटाच्या मीनाकारी वर्क केलेल्या आकर्षक वस्तूंची पाहणी केली. तसेच खंडाळे ग्रामपंचायत येथील शिवणकला युनिट आणि परहूर ग्रामपंचायत येथील ड्रॅगनफ्रूट शेती प्रकल्पालाही भेट देण्यात आली.
महिलांनी अल्प साधनसामग्रीतून उभारलेले उद्योग, त्यातून निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रयत्नांची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. विविध उत्पादनांची गुणवत्ता आणि महिलांची उद्यमशीलता पाहून नेहा भोसले यांनी बचतगटांच्या सदस्यांचे विशेष कौतुक केले.
महिला बचतगटांनी ग्रामीण भागातील आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असून भविष्यातही अशा उपक्रमांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य दिले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. तसेच बचतगटांच्या महिलांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here