वाकडमधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी रोहित पवारांची पोलिसांशी चर्चा; कठोर कारवाईची मागणी

0
6
जाचक अटी हटवल्याशिवाय आंदोलन मागे नाही; रोहित पवार यांचा इशारा
जाचक अटी हटवल्याशिवाय आंदोलन मागे नाही; रोहित पवार यांचा इशारा

वाकडमधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी रोहित पवारांची पोलिसांशी चर्चा; कठोर कारवाईची मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात ५ आणि १० वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर ६० वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी वाकड पोलीस ठाण्याला भेट देत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तपासात कोणतीही त्रुटी राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
रोहित पवार यांनी डीसीपी प्रदीप जाधव, एसीपी सुनील कुऱ्हाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांची भेट घेऊन प्रकरणाचा आढावा घेतला. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांकडून चांगले सहकार्य मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, पुढील तपास अत्यंत संवेदनशीलतेने, वेगाने आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
या प्रकरणातील पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या भेटीदरम्यान आमदार सुनील भुसारा, ॲड. रविकांत वरपे, सुनील माने, सुनील गव्हाणे, साकी गायकवाड, ॲड. श्रृती साकी गायकवाड, विशाल वाकडकर, रितू कांबळे आणि सुनील कसपटे उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here