विद्यार्थ्यांनी चिकित्सक, संयमी व बुध्दीमान होण्यासाठी प्रयत्न करावेत – लेखिका शरयू घाडी यांचे प्रतिपादन

0
15
विद्यार्थ्यांनी चिकित्सक, संयमी व बुध्दीमान होण्यासाठी प्रयत्न करावेत - लेखिका शरयू घाडी यांचे प्रतिपादन
विद्यार्थ्यांनी चिकित्सक, संयमी व बुध्दीमान होण्यासाठी प्रयत्न करावेत - लेखिका शरयू घाडी यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी चिकित्सक, संयमी व बुध्दीमान होण्यासाठी प्रयत्न करावेत – लेखिका शरयू घाडी यांचे प्रतिपादन

ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी येथे विद्यार्थ्यांना एकाग्र अभ्यासाचे मार्गदर्शन

आचरा-विवेक परब
ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी प्रशाळेत दि. ३०/०७/२०२६ रोजी “पंखा विना भरारी” या पुस्तकाच्या लेखिका शरयू घाडी यांचनी इ. ९ वी व इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना “अभ्यास करताना एकाग्र कसे व्हावे” या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. प्रशालेतील ४४ विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.विद्यार्थ्यांनी चिकित्सक, संयमी व बुध्दीमान होण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन शरयु घाडी यांनी विद्यार्थ्यांना केले. पुढे मार्गदर्शन वर्गात शरयु घाडी मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना एकाग्रतेचे महत्त्व विशद केले.
संस्कार, चिकाटी, मेहनत, निरीक्षण याबद्दल उदाहरणे देऊन ते आत्मसात कसे करावे हे पटवून दिले. सर्व मुले एकाग्रतेने मॅडमचे मार्गदर्शन तीन तास ऐकत होती. शरयु घाडी मॅडम को.म.सा.प च्या आजीव सभासद आहेत. बाल प्रबोधिनी या संस्थेमार्फत मॅडम प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास यावर मार्गदर्शन करतात. मुलांना एक उपक्रम देऊन या मार्गदर्शन वर्गाची सांगता केली. संस्थाध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू यांच्या शुभ हस्ते मॅडमचे स्वागत करण्यात आले. प्रशालेच्या शिक्षिका सौ. केतकी समीर बावकर यांनी परिचय व आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here