अहमदाबाद–मंगळुरू साप्ताहिक विशेष एक्सप्रेसच्या फेऱ्यांना मुदतवाढ

0
20
अहमदाबाद–मंगळुरू साप्ताहिक विशेष एक्सप्रेसच्या फेऱ्यांना मुदतवाढ
अहमदाबाद–मंगळुरू साप्ताहिक विशेष एक्सप्रेसच्या फेऱ्यांना मुदतवाढ

अहमदाबाद–मंगळुरू साप्ताहिक विशेष एक्सप्रेसच्या फेऱ्यांना मुदतवाढ

मुंबई, दि. १ : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी म्हणून कोकण रेल्वेने अहमदाबाद–मंगळुरू–अहमदाबाद (गाडी क्र. ०९४२४/०९४२३) साप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाडीच्या फेऱ्यांची मुदत ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या विशेष गाडीचे विद्यमान वेळापत्रक, रचना (कोच कंपोझिशन) आणि थांबे कायम ठेवून सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.
वाढीव कालावधी पुढीलप्रमाणे :
🔹 गाडी क्र. ०९४२४ अहमदाबाद–मंगळुरू जंक्शन साप्ताहिक विशेष (प्रत्येक शुक्रवारी) – ३१ जुलै २०२६ पर्यंत नियोजित असलेली सेवा आता २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालविण्यात येणार आहे.
🔹 गाडी क्र. ०९४२३ मंगळुरू जंक्शन–अहमदाबाद साप्ताहिक विशेष (प्रत्येक शनिवारी) – १ ऑगस्ट २०२६ पर्यंत नियोजित असलेली सेवा आता २९ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
कोकण रेल्वेने प्रवाशांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, गाडीच्या थांब्यांबाबत व वेळापत्रकाबाबत अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here