लोकमान्य टिळकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन; जन्मस्थळी ध्वजारोहण

0
21
लोकमान्य टिळकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन; जन्मस्थळी ध्वजारोहण
लोकमान्य टिळकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन; जन्मस्थळी ध्वजारोहण

लोकमान्य टिळकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन; जन्मस्थळी ध्वजारोहण

रत्नागिरी, दि. १ :
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजस्तंभावर तिरंग्याचे ध्वजारोहणही करण्यात आले.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असा निर्धारपूर्ण संदेश देत भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवे चैतन्य देणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत गायले. त्यानंतर जन्मस्थळ परिसरातील लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच अर्धपुतळ्यासही पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन व ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाची पाहणी करण्यात आली. उपस्थितांनी प्रदर्शनातून टिळकांच्या कार्याचा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा आढावा घेतला.
कार्यक्रमास प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे तसेच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी लोकमान्य टिळकांना अभिवादन करून त्यांच्या राष्ट्रसेवेच्या कार्याला आदरांजली अर्पण केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here