रायगड जिल्ह्यात ६०७.४ मिमी पावसाची नोंद; माथेरानमध्ये सर्वाधिक २३१ मिमी वर्षाव

0
68

रायगड जिल्ह्यात ६०७.४ मिमी पावसाची नोंद; माथेरानमध्ये सर्वाधिक २३१ मिमी वर्षाव

रायगड :
रायगड जिल्ह्यात ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ६०७.४ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी पर्जन्यमान ३७.९६ मिमी इतके आहे. जिल्ह्यातील माथेरान येथे सर्वाधिक २३१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार तालुकानिहाय पर्जन्यमान पुढीलप्रमाणे आहे :
तालुका पर्जन्यमान (मिमी)
माथेरान 231
पनवेल 67.4
सुधागड 54
कर्जत 49
खालापूर 40
पेण 34
रोहा 26
माणगाव 22
मुरूड 21
तळा 17
म्हसळा 13
उरण 11
महाड 8
पोलादपूर 8
अलिबाग 3
श्रीवर्धन 3
माथेरानमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाल्याने परिसरातील नाले, ओढे आणि धबधबे प्रवाही झाले आहेत. तर पनवेल, सुधागड, कर्जत आणि खालापूर तालुक्यांतही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, डोंगराळ भाग, धबधबे आणि नदीकाठच्या परिसरात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here