एम.आर्च. (M.Arch.) प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ सुरू; ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख ७ ऑगस्ट
एम.आर्च. (M.Arch.) प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ सुरू; ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख ७ ऑगस्ट
मुंबई : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मास्टर ऑफ आर्किटेक्चर (M.Arch.) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवारांना ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची संधी उपलब्ध आहे.
प्रवेश प्रक्रियेनुसार महाराष्ट्र राज्य तसेच अखिल भारतीय (All India) उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया ३० जुलै २०२६ पासून सुरू झाली आहे. अर्ज भरल्यानंतर कागदपत्र पडताळणी व अर्जाची पुष्टीकरण प्रक्रिया ई-स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीने करता येणार आहे.
कागदपत्र पडताळणी व अर्ज पुष्टीकरणाची अंतिम मुदत ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
सीईटी सेलने सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्प्यांबाबत अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे भेट देण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या तारखा :
📌 ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू : ३० जुलै २०२६ 📌 ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख : ७ ऑगस्ट २०२६ (सायं. ५.०० वाजेपर्यंत) 📌 कागदपत्र पडताळणी व अर्ज पुष्टीकरण सुरू : ३१ जुलै २०२६ 📌 कागदपत्र पडताळणीची अंतिम तारीख : ८ ऑगस्ट २०२६ (सायं. ५.०० वाजेपर्यंत)