दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करा; प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा – आदिती तटकरे

0
14
दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करा; प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा – आदिती तटकरे
दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करा; प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा – आदिती तटकरे

दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान करा; प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा – आदिती तटकरे

मुंबई, प्रतिनिधी :
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील दत्तक प्रक्रियेचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यात दत्तक प्रक्रियेत उल्लेखनीय प्रगती झाली असून महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काही प्रकरणांमध्ये नातेवाईकांच्या संमतीचा अभाव, वैद्यकीय चाचण्या तसेच इतर कायदेशीर प्रक्रियांमुळे विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक जलद आणि परिणामकारक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून राज्यातील प्रलंबित दत्तक प्रकरणांचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
“प्रत्येक कायदेशीररित्या मुक्त बालकाला सुरक्षित, स्थिर आणि प्रेमळ कुटुंब मिळावे, यासाठी दत्तक प्रक्रिया अधिक वेगवान करण्यावर भर दिला पाहिजे,” असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील दत्तक प्रक्रियेची सद्यस्थिती
महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सध्या ६२ विशेष दत्तक संस्था कार्यरत आहेत. सन २०२६-२७ मध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील १,२८३ बालके दत्तक प्रक्रियेसाठी कायदेशीररित्या उपलब्ध आहेत. चालू वर्षात आतापर्यंत १५७ बालकांना दत्तक देण्यात आले, तर २३९ बालकांची नातेवाईकांमार्फत दत्तक प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण करण्यात आली आहे.
दत्तक प्रक्रिया कशी राबविली जाते?
दत्तक प्रक्रिया ही केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण (CARA), राज्य दत्तक संसाधन संस्था, विशेष दत्तक संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा दंडाधिकारी आणि दत्तक इच्छुक पालक यांच्या समन्वयातून राबविली जाते. ही प्रक्रिया CARA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जाते.
दत्तक घेण्यास इच्छुक पालकांनी केंद्र सरकारच्या CARINGS पोर्टल वर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here