इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांबाबत १९ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात विशेष बैठक

0
12
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांबाबत १९ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात विशेष बैठक
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांबाबत १९ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात विशेष बैठक

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांबाबत १९ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात विशेष बैठक

सिंधुदुर्ग, प्रतिनिधी :
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील पात्र लाभार्थी आणि सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्ग येथील मध्यवर्ती सभागृहात पार पडणार आहे.
इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC) तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा तसेच समाज विकासासाठी कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संस्थांना योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक, स्वयंरोजगार, कौशल्य विकास तसेच इतर कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच उपस्थितांच्या शंकांचे निरसनही करण्यात येणार आहे.
आरक्षित समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच समाज विकासासाठी कार्यरत विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here