पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र मसुदा अधिसूचना जारी; सिंधुदुर्गातील १९८ गावांचा समावेश प्रस्तावित

0
12

सिंधुदुर्ग : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने पश्चिम घाट परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (Eco-Sensitive Zone – ESZ) म्हणून घोषित करण्यासाठी २७ जुलै २०२६ रोजी मसुदा अधिसूचना जारी केली आहे. या मसुद्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे.
सदर अधिसूचना केंद्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आली असून ती ई-गॅझेट संकेतस्थळ वर उपलब्ध आहे.
मसुदा अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांमधील एकूण २,५१५ गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या पाच तालुक्यांतील १९८ गावांचा समावेश आहे.
या प्रस्तावित अधिसूचनेमुळे प्रभावित होणारे स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, संस्था, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित भागधारकांनी आपल्या हरकती अथवा सूचना अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत केंद्र शासनाकडे सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ आणि त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमांनुसार हरकती व सूचना पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली – ११०००३ या पत्त्यावर टपालाद्वारे किंवा [email protected] या ई-मेलद्वारे पाठविता येणार आहेत.
पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाबतची ही अधिसूचना सिंधुदुर्गसह कोकणातील अनेक गावांवर परिणाम करणारी असल्याने स्थानिक पातळीवर याबाबत चर्चा सुरू झाली असून नागरिकांनी अधिसूचनेचा अभ्यास करून आवश्यक सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here