रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे एकूण 520 शिक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये मराठी माध्यमासाठी 485 तर उर्दू माध्यमासाठी 35 पदांचा समावेश आहे.
या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावयाचा असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले आहे.
भरती प्रक्रियेविषयी अधिक माहिती आणि ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारांनी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी.