मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचे जिवंत दीपस्तंभ : श्री गुरू तेग बहादूरजी

0
6

नवी मुंबई | प्रतिनिधी
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे ‘श्री गुरू तेग बहादूर जी यांचा वारसा’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात पार पडले. विविध क्षेत्रांतील मान्यवर, अभ्यासक आणि नागरिकांच्या उपस्थितीत आयोजित या चर्चासत्रात श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये ‘श्री गुरू तेग बहादूर अध्यासन’ (Chair) स्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले. आंतरधर्मीय संवाद, संशोधन आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी हे अध्यासन कायमस्वरूपी केंद्र म्हणून कार्य करेल, असे त्यांनी सांगितले.
चर्चासत्रात श्री गुरू तेग बहादूरजी यांना ‘हिंद दी चादर’ म्हणून गौरवण्यात आले. सर्व धर्मांच्या लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान हे मानवी हक्क, सहिष्णुता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
यावेळी महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक व आध्यात्मिक संबंधांवरही प्रकाश टाकण्यात आला. संत नामदेव महाराज आणि श्री गुरू गोविंद सिंग जी यांच्या कार्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये शतकानुशतके दृढ आध्यात्मिक नाते निर्माण झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here