
कागलमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
कागल | प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कागल येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासह शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी कागल नगरपरिषदेच्या वतीने हिंदूराव घाटगे विद्यालयाच्या जीर्णोद्धार कामाचे लोकार्पण तसेच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार होत्या.


