महाराष्ट्रातील खो-खोला डिजिटल बळ; सर्व जिल्हा संघटनांना अत्याधुनिक लॅपटॉपचे वितरण

0
17
महाराष्ट्रातील खो-खोला डिजिटल बळ; सर्व जिल्हा संघटनांना अत्याधुनिक लॅपटॉपचे वितरण
महाराष्ट्रातील खो-खोला डिजिटल बळ; सर्व जिल्हा संघटनांना अत्याधुनिक लॅपटॉपचे वितरण

महाराष्ट्रातील खो-खोला डिजिटल बळ; सर्व जिल्हा संघटनांना अत्याधुनिक लॅपटॉपचे वितरण

मुंबई :
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा खो-खो संघटनांना अत्याधुनिक लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या आणि परंपरेशी जोडलेल्या खो-खोला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा केवळ लॅपटॉप वितरणाचा कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या खो-खोच्या गौरवशाली परंपरेच्या आधुनिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे नमूद केले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील खो-खो संघटनांचे कामकाज अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आदरणीय अजितदादांच्या नेतृत्व, मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने उल्लेखनीय प्रगती केली आहे, असे सांगत त्यांनी या स्तुत्य उपक्रमासाठी कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले.
लॅपटॉपच्या माध्यमातून जिल्हा संघटनांना खेळाडूंची नोंदणी, स्पर्धांचे नियोजन व व्यवस्थापन, गुणपत्रिका तयार करणे, प्रमाणपत्रे तसेच विविध प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने करता येणार आहे.
महाराष्ट्राच्या पारंपरिक खो-खोचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे, खेळाडूंना अधिक सक्षम करणे आणि खो-खोला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here