DBSKKV RPTO दापोली केंद्रात ड्रोन प्रशिक्षणाच्या २०व्या बॅचचे यशस्वी समापन

0
16
दापोली, DBSKKV, ड्रोन प्रशिक्षण, RPTO, DGCA, रिमोट पायलट, ड्रोन तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठ, ड्रोन पायलट
दापोली, DBSKKV, ड्रोन प्रशिक्षण, RPTO, DGCA, रिमोट पायलट, ड्रोन तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठ, ड्रोन पायलट

DBSKKV RPTO दापोली केंद्रात ड्रोन प्रशिक्षणाच्या २० व्या बॅचचे यशस्वी समापन

दापोली :
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील DGCA मान्यताप्राप्त RPTO केंद्रात ११ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित ड्रोन रिमोट पायलट प्रशिक्षणाच्या २०व्या बॅचचे यशस्वीरीत्या समापन झाले.
या बॅचमध्ये एकूण ११ प्रशिक्षणार्थींनी Medium Class Drone श्रेणीतील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना ड्रोनचे सुरक्षित संचालन, सुरक्षा नियम तसेच प्रत्यक्ष ड्रोन उड्डाणाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण ड्रोन प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. संतोष सावर्डेकर आणि सहप्रमुख डॉ. अमित देवगिरीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रशिक्षणार्थी तसेच RPTO केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता अशा प्रशिक्षणामुळे कुशल ड्रोन ऑपरेटर घडण्यास मदत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here