कविवर्य ना. धों. महानोर साहित्य आणि शेती-पाणी पुरस्कार जाहीर
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य आणि शेती-पाणी पुरस्कार जाहीर
यशवंतराव चव्हाण सेंटर आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे कविवर्य ना. धों. महानोर साहित्य आणि शेती-पाणी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे.
यंदाच्या शेती-पाणी पुरस्कारासाठी जळगाव येथील वैशाली प्रभाकर पाटील आणि जालना येथील सीमा क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे.
तर कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कारासाठी मुंबई येथील अविनाश उषा वसंत, बुलढाणा येथील प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी, चंद्रपूर येथील श्रीकांत साव आणि सातारा येथील विठ्ठल खिलारी यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारांचे वितरण ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे. चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार आणि जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
साहित्य, शेती आणि पाणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.